ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंडियन आर्मी झिंदाबादच्या घोषणा देत सिडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

दिल्ली : तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह इतर अकरा जणांनी प्राण गमावले. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव काल मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं गेलं. काही मिनिटांपूर्वी बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे.थोड्याच वेळात बिपीन रावत आणि इतर १३ जणांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

 

अत्यंत शोकाकुल वातावरणात दिल्लीच्या रस्त्यावरून सिडीएस बिपीन राऊत यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. यावेळी लष्कराकडून तोफांचा सलामी दिली जाणार आहे. त्यासाठी लष्कराकडून आणि प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीत नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे.अत्यंत शोकाकुल वातावरणात दिल्लीच्या रस्त्यावरून सिडीएस बिपीन राऊत यांना अखेरचा निरोप दिला जात आहे.स्वयंस्फूर्तीने बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेत सामील होत आहेत. उपस्थितांकडून बिपिन राऊत अमर रहे, भारत माता की जय,वंदे मातरम, हिंदुस्थान आर्मी झिंदाबाद अशा घोषणा देत आहेत.

आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी, लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे, वायू दलाचे प्रमुख एयर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदल प्रमुख आर. हरी कुमार या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!