---Advertisement---

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला “या” प्रकरणी हायकोर्टाकडून दिलासा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विरोधात आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार यांनी दाखल केलेल्या याचिका मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. महेंद्रसिंग धोनीवर २०१४ च्या आयपीएल सामन्यांमध्ये सट्टेबाजी, स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगमध्ये सामिल असल्याचे आरोप झाले होते.

या संदर्भात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने माध्यमांवर आणि अन्य काही व्यक्तींवर शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला होता.

यात जी. संपत कुमार यांचाही समावेश होता. त्यावेळी जी. संपत यांनी आपल्यावरील मानहानीचा दावा मागे घेण्यात यावा, यासाठी धोनी विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळत न्यायालयाने महेंद्रसिंग धोनीला मोठा दिलासा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!