मूकनायकाचा शतकोत्तर महोत्सवी वर्ष ; राष्ट्रीय पत्रकार दिवस जाहीर करण्याची इंडियन प्रेस क्लब ची मागणी
अक्कलकोट दि,३१ : महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० रोजी आपले पहिले पाक्षिक मूकनायक प्रकाशित केले.त्या घटनेस शंभर वर्षे पूर्ण होऊन गेली असून शतकोतरी महोत्सवी वर्षात राष्ट्रीय पत्रकार संघटना इंडियन प्रेस क्लब ने हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून घोषित करण्याची मागणी सोलापूर जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने मूकनायक ते प्रबुद्ध भारत या बाबासाहेब आंबेडकर लिखित,संपादित वृत्तपत्रावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिसंवादाचे येथील खेडगी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ३१ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून घोषणा करावी याचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर म्हणाले,मूकनायक हा महानायक बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा आद्यबिंदू होता.अनेक अडचणी आणि तीव्र संघर्ष असतानाही बाबासाहेबांनी इंग्रजांच्या भूमीतून मूकनायकाचे अग्रलेख लिहिले. मूकनायक सुरू करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये पंचवीसशे रुपयांची आर्थिक मदत केल्याचे इतिहासात नोंद आहे.अस्तित्वाच्या संघर्षातून निघालेल्या वृत्तपत्राचे शतकोत्तर महोत्सवी वर्ष साजरा करणे बहुजन समाजाचे प्रथम कर्तव्य आहे.देशातील अनेक प्रतिष्ठित पत्रकार संघटनांनी ३१ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिवस व्हावा यासाठी संमती दिली आहे.
या कार्यक्रमास आरपीआय चे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, लिंगायत समाजाचे जेष्ठ नेते सुधीर माळशेट्टी,दिनेश रूही,शुभम मडीखांबे, आकाश माने,अंबादास शिंगे, सुरेश सोनकांबळे, सुरेश गायकवाड,राजू माशाळे,अजित मैंदर्गीकर आदी मान्यवर उपस्थित होते.