दुधनी दि. १४ : दुधनी शहरात आजपासुन पाच दिवसाच्या गणेश मुर्तिंचा विसर्जनाला सुरुवाती झाली आहे. त्यासाठी दुधनी नगर परिषदेच्यावतीने कृत्रीम तलावची निर्मिती करण्यात आले आहे. शहरातील घरगुत्ती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींच्या विसर्जन दुधनी नगरपरिषद मार्फत तयार करण्यात आलेल्या कृत्रीम तलावातच करावे, असे आवाहन दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आतिष वाळुंज यांनी केली आहे.
दुधनी नगर परिषदेच्यावतीने येथील मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला परिसरात ३० बाय ४० रुंद, ७ फुट खोल असे एक कृत्रीम तलाव तयार करण्यात आले आहे. कृत्रीम तलावत गणेश मुर्ती विसर्जन करण्याचा उपक्रम दुधनी शहरात पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. त्याला नगरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सार्वजनिक विहिरिंमध्ये होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसणार आहे.
गणेश विसर्जन ठिकाणी दोन लाईफ गार्ड नियुक्ती करण्या बरोबर रात्रीच्या वेळेस लाईटचा व्यवस्था करण्यात आले आहे. शहरातील घरगुती व गणेश मंडळांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी आतिष वाळुंज यांनी केली आहे.