ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉँग्रेसला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता ; सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरील बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला, काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत?

मुंबई : काँग्रेसचे युवा नेते व नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने पक्षाने सुधीर तांबे यांना निलंबित केले आहे. त्यानंतर आता सत्यजीत तांबे यांच्याही निलंबनाचे संकेत देण्यात आहेत. मात्र, कारवाईच्या आधीच सत्यजीत तांबेच काँग्रेस सोडण्याची शक्यता आहे. त्यांनी सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल बदलले असून ट्विटर डीपी आणि बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळं ते कॉँग्रेसला राम राम करणार हे स्पष्ट झाले आहे.

कॉँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी सुधीर तांबे यांच्या प्रमाणे सत्यजित तांबे यांचेही निलंबन करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, त्या पूर्वीच सत्यजित तांबे हे पक्षाला सोडण्याच्या तयारीत आहेत. याचे सुतोवाच त्यांनी त्यांच्या सर्व सोक्षल मीडियाच्या अकाऊंटवरुन कॉँग्रेसचा उल्लेख आणि फोटो काढून दिले आहेत. तसेच सत्यजित यांनी एक ट्विट देखील केले आहे. त्यात त्यांनी, कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं’ असे लिहिले आहे. दरम्यान, ते आता पदवीधर निवडणुकीत जिंकणार का या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सत्यजीत तांबे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, सत्यजीत तांबे यांनी अर्ज मागे न घेतल्याने ते लढण्याच्या तयारीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!