अक्कलकोट, दि.१ : कोविडमुळे पालक गमावलेल्या अक्कलकोट तालुक्यातील सोनार, सुतार या पांचाळ समाजातील गरीब, निराधार व अनाथ बालकांचे संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेदपाठक यांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. या महामारीत अनेकांना आपला जीव गमावावा लागलेला आहे. कित्येकांना हॉस्पिटलचा मोठा खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. काही ठिकाणी तर लहान बालकांचे दोन्ही पालक गमावले आहेत यामुळे बालक निराधार झाले आहेत. गरीब परिस्थितीमुळे त्या बालकांचे शैक्षणिक आयुष्य उद्धवस्त होण्याची शक्यता आहे अश्या अक्कलकोट शहर व तालुक्यातील सोनार, सुतार या पांचाळ समाजातील कोविड मुळे निराधार झालेल्या गरीब बालकांचे या वर्षा पासून पुढील संपूर्ण शैक्षणिक खर्च वेदपाठक परिवाराकडून करण्यात येणार आहे.
कोविड, कोरोनामुळे पालक गमावलेल्या अश्या गरीब, अनाथ व निराधार पांचाळ समाजातील बालकांचे नातेवाईक किंवा त्यांचे हितचिंतकांनी चंद्रकांत वेदपाठक ( मो. 9850048111 ) यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन विठ्ठल वेदपाठक, सुरेश व अनिल वेदपाठक यांनी केले आहे.