अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे चपळगाव व बावकरवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते त्याप्रसंगी झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी काल रविवारी चपळगाव येथे निषेध म्हणून रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आले. याप्रसंगी मराठा समाजातील तरुण युवकांनी आपल्या भावना व्यक्त केले.याप्रसंगी
नायब तहसीलदार विकास पवार व पोलीस उपनिरीक्षक महेश भावीकट्टी यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे ,अक्कलकोट बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील,ज्येष्ठ नेते नंदकुमार पाटील,शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज इंगोले यांच्यासह लक्ष्मण जाधव, भगवान जाधव, गुंडा चव्हाण ,सुरेश इंगोले, मल्लिनाथ सोनार, गोकुळ मोरे, संतोष मोरे, श्रीमंत इंगोले, केतन सुरवसे, प्रदीप सुरवसे ,प्रकाश सुरवसे, सुरेश सुरवसे, अविनाश कदम, गुलाब बानेगाव ,भीमाशंकर दुलंगे ,संगप्पा अंबारे, दीपक कांबळे ,तमा गजधाने ,गंगाराम भोसले, आकाश सुरवसे, रमेश शिंदे, श्रीमंत सोनार ,मच्छिंद्र सुरवसे, मारुती शिंदे, शिवानंद जकापुरे, राजकुमार भंगे, घाळप्पा सराटे, अखिल कवठेकर, बसवराज बनजगोळ, हनुमंत तोळणूरे, खंडू कोरे ,विजय बिराजदार, संतोष मोरे, श्रीमंत इंगोले ,योगेश मोरे ,आकाश इंगोले यांच्यासह बावकरवाडी व चपळगाव येथील सकल मराठा समाज व चपळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त
होता.