रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलने अल्पावधीतच नाव कमाविले;खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे प्रतिपादन
अक्कलकोट,दि.२९ : रिणाती इंग्लिश
मीडियम स्कूलने चपळगाव परिसरात अल्पावधीतच नाव कमावले आहे या शाळेतून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे,
असे गौरवोद्गगार खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी काढले.शनिवारी,अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील रिणाती इंग्लिश मिडीयम स्कुल
आणि संतोषदादा पाटील मराठी
विद्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
जेष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी हे होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा सरपंच उमेश पाटील,तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील,के.बी.पाटील,अंबणप्पा भंगे,अमर पाटील,सिध्दाराम भंडारकवठे,बसवराज बाणेगांव,मनोज इंगुले,राहुल काळे,अशोक गुरव,सुमन पाटील,
रोहिणी पाटील,वर्षा पाटील,बसवराज पाटील,मुख्याध्यापक सुभाष बिराजदार,मुख्याध्यापक दिगंबर जगताप,ज्ञानेश्वर कदम,सुरेश सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ
व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक अध्यक्ष पाटील यांनी केले.ग्रामीण भागात शिक्षणाचा योग्य तो प्रसार व्हावा.शिक्षणाच्या माध्यमातुन
प्रत्येक कुटूंबाची जडणघडण योग्य रितीने व्हावी या उद्देशाने संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विविध
रूपात कलाविष्कार सादर केला.यात
प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या,देशभक्ती,धार्मिक,सामाजिक,
राजकीय,शैक्षणिक,सांस्कृतिक यांसह विविध विषयांवर नृत्याविष्कार,मुकनाट्य आदी
प्रकार सादर करीत उपस्थितांची मने
जिंकली.यासाठी भव्य स्टेज उभा करण्यात
आला होता. अचूक नियोजन व्यवस्थेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.चपळगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक,शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनश्री वाले,चंद्रकांत बिराजदार,महादेवी पाटील,विश्वजीत कांबळे,रेखा पाटील,
आश्विनी सावळे,अर्चना पुजारी,सौंदर्या विजापूरे ,निकिता दुलंगे,आरती नडगिरे,युसरा पिरजादे आदींनी सहकार्य
केले.
चपळगावसाठी आणखी
निधी देऊ
प्रारंभी खासदार स्थानिक विकास निधीतून संतोष पाटील घर ते बँक ऑफ इंडियापर्यंत सिमेंट रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सरपंच उमेश पाटील यांनी श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसराच्या विकासासाठी भाषणात निधी देण्याची मागणी केली.त्यावेळी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी तातडीने लवकरच निधी देत असल्याची ग्वाही दिली.