सोलापूर: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालक डॉ. राजाराम कोकरे यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचं प्रकरण 2020 मध्ये उघडकीस आला होता. त्यावेळी आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये खळबळ उडाली होती. सिनेट सदस्यांनी देखील याबाबात आक्रमक भूमिका घेतली होती. यासंबंधीचं एक प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
डॉ. कोकणे यांच्यासह यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, सुविधा समन्वय हसन शेख , प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड यांना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपींवर पैसे घेऊन गुणवाढ करणे कुलगुरूंचा पासवर्ड हॅक करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्या प्रकरणाची पहिली सुनावणी 22 मार्चला झाली होती. पुढील सुनावणी आता 25 जून रोजी होणार आहे. डॉ. कोकणे यांच्यासह यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, सुविधा समन्वय हसन शेख , प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.