अक्कलकोट : सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी अक्कलकोट तालुका माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर संघाच्या नूतन अध्यक्षपदी मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलचे चेतन जाधव (अक्कलकोट) यांची तर नूतन सचिवपदी श्रीमती धोंडूबाई प्रशालेचे चंद्रकांत हरळय्या यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोलापूर येथील मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात अक्कलकोट तालुक्याच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. निवड समितीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे सोलापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा सचिव मुश्ताक शेतसंदी होते. जिल्हा कोषाध्यक्ष महेश रामशेट्टी,जिल्हा सदस्य विकास तळवार, दक्षिण सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष षडाक्षरी स्वामी हे उपस्थित होते. या बैठकीत अक्कलकोट तालुक्याचे नूतन पदाधिकारी बिनविरोधपणे निवडण्यात आले. इतर नूतन कार्यकारणीचे पदाधिकारी पुढीप्रमाणे
नूतन अध्यक्ष चेतन चंद्रकांत जाधव, (अक्कलकोट) उपाध्यक्ष लालसाब मकबुल यत्नाळ (करजगी), उपाध्यक्ष रवि थोंटे (चपळगाव), उपाध्यक्ष धर्मराज अमृत अरबाळे (सातनदुधनी), सचिव चंद्रकांत रामण्णा हरळय्या (चुंगी), सहसचिव विकास इस्टलींगप्पा नडगेरी (वागदरी), खजिनदार अल्लिशा लालशा मकानदर (बोरगाव), सहखजिनदार हणमंतराव वसंतराव पाटील (दुधनी), कार्यकारिणी सदस्य अनिल शरणाप्पा देशेट्टी (बोरगाव), विक्रांत वसंतराव गोडसे (अक्कलकोट), दाजीसाहेब बाबासाहेब लोंढे पाटील (दहिटने), सेवक प्रतिनिधी दिलीपकुमार पंडीत (होटगी), सल्लागार म्हणून वसंत शिवप्पा आरेनवरू (मैंदर्गी), सुभाष रंगदाळ, करजगी आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा सचिव शेतसंदी व जिल्हा कोषाध्यक्ष रामशेट्टी यांनी सत्कार केला. याप्रसंगी नूतन तालुका अध्यक्ष चेतन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेचे राज्य सरचिटणीस शिवाजीराव खांडेकर यांनी नूतन अध्यक्ष जाधव व इतर पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. अक्कलकोट तालुक्यातील सर्व लिपिक,प्रयोगशाळा परिचय आणि सेवक यांच्या उपस्थितीत वरील कार्यकारणीची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन वसंत आरेनवरू यांनी तर आभार प्रदर्शन नूतन अध्यक्ष चेतन जाधव यांनी केले.