छत्तीसगड : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना असंख्य लोकांसमोर चाबकाने फटकावण्यात आले. त्यांच्या हातावर चाबकाचे पाच फटके मारण्यात आले असून ही तिथल्या गौरी-गौरा पूजेदरम्यानची प्रथा आहे. चाबकाने फटकावले जाण्याला तिथे सोटा म्हणतात.
सोंटे का प्रहार और परंपराओं का निर्वहन. pic.twitter.com/SV82qommmu
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) October 25, 2022
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आवाज न काढता सोट्याचे पाच फटके गुपचूप सहन केले. गौरी-गौराच्या पूजेनंतर पाळली जाणारी ही प्रथा आहे. आसूडाचे फटके सहन केल्याने येणारी अरीष्ट्य दूर होतात आणि जीवनात आनंद पसरतो असा समज आहे.
भूपेश बघेल दररोजच्या पूजेनंतर जंजगिरी गावात आले होते. इथल्या चौकात त्यांनी गौरी -गौराची पूजा केली. यानंतर गावचे सरपंच बीरेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला आणि त्यांनी मुख्यमंत्री बघेल यांच्या हातावर सोट्याचे फटके मारले. राज्याच्या भरभराटीची प्रार्थना करत मुख्यमंत्री बघेल दरवर्षी ही प्रथा पाळतात आणि हातावर बसणारे फटके सहन करत असतात.