ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री विमानतळावर दाखल : आ. कल्याणशेट्टी यांनी केले स्वागत !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.२९ रोजी तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माजी खासदार श्री सिद्धेश्वर स्वामी, महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त दिपाली काळे, विजय कबाडे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, शहर अध्यक्ष नरेंद काळे यांनी ही मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वागत केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांचे सोलापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने तुळजापूर येथील कार्यक्रमासाठी प्रयाण झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!