मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू सुरू असताना ही समाधी हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. यासंदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले होते. या वादात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी उडी घेतली आणि वाद आणखी पेटला. संभाजी भिडेंनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीची कथा सांगितली. हा वाद सुरु असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
माजी खासदार संभाजी राजे यांनी कुत्र्याची समाधी काढून टाकण्यासाठी सरकारला ३१ मे पर्यंतची मुदत देखील दिली होती. वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही, त्यामुळे अशा कपोलकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं, ही छत्रपती शिवाजी महाराजांशी घोर प्रतारणा असल्याचे संभाजीराजे यांचे म्हणणे आहे.
वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समिती नेमणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच समिती गठीत होणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. शिवपुण्यतिथी निमित्त संभाजीराजांनी महाराजांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर त्यांनी बोलताना ही माहिती दिली.
दरम्यान, वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समिती नेमणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठंही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही. सर्व इतिहासकारांनी देखील हे स्पष्टपणे सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच समिती गठित होणार आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
किल्ले रायगड वर शिवपुण्यतिथी निमित्त गुरुवारी संभाजीराजे आले होते, त्यावेळी त्यांनी किल्ले रायगडला भेट देवून शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसेच किल्ले रायगडाचे सौदय जपावे असे आवाहन देखील राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.