मुंबई : नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉ. राहुल गेटे यांना मिळालेल्या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेटे यांच्या घरी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र पाठवले आहे. नवी मुंबई पोलिसांना हे धमकीचे पत्र देऊन तपास करण्यास सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली पाच वर्षे डॅाक्टर राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी OSD म्हणून कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकास कामे सुरू केली होती. तेव्हा पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. तेव्हा या विकास कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून राहुल गेठे यांच्यावर होती. आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राहुल गेठे यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी राहुल गेठे यांना टार्गेट करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
काय लिहिले आहे त्या पत्रामध्ये?
जय लाल सलाम,
जय किसान
डॅाक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी…
एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅाक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.
जय नक्षलवाद