कुरनूर दि.७ जिल्हा परिषद मराठी शाळा चुंगी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात पार पडले. चिमुकल्यांच्या या कलेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सारिका चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच महादेव माने होते. देशभक्तीपर गीत, बळीराजाचे शेतकरी गीत, व महाराष्ट्राची अस्सल मराठी लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या लहान वयातच चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. म्हणून पालकांनीही आपल्या पाल्यांना प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन प्रहारचे रासाहेब चव्हाण यांनी केले.
श्रीमती धोंडूबाई स्वामी माध्य. व उच्च माध्य. प्रशाला चुंगी च्या मैदानावर सन २०२३ च्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे मुख्याध्यापक किरण गायकवाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. शालेय समितीचे उपाध्यक्ष सुनील माने यांनी मंडप ,स्टेज व स्पीकर मोफत दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यध्यापिका देवर कोंडा, गिरीधर चव्हाण व दत्तात्रय सावंत या शिक्षकांचे शालेय समितीचे अध्यक्ष रविराज माने, सरपंच सारिका चव्हाण, महादेव माने, विजय कुलकर्णी आदींनी अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी संतोष पाटील, दिलीप काजळे, दिगंबर चव्हाण, अनिल गायकवाड, हरिदास जाजनुरे, दयानंद काजळे, परमेश्वर चव्हाण, सागर माने, तुकाराम दुपारगुडे, बालाजी माने ,प्रसाद बागल, अभिजीत माने, श्रीशैल स्वामी,जयनारायण साळुंखे, गोविंद मोरे, ईश्वर पवार ,अमर काजळे, कैलास चव्हाण, नामदेव चव्हाण, शिवाजी काजळे, पवन रेड्डी, मल्लिनाथ वरदे, जनार्दन चव्हाण, शशिकांत फडतरे, महेश वर्दे, जितेंद्र वर्दे, औदुंबर गंगाधर, महेश कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच केंद्रप्रमुख महादेव चव्हाण, कदरगे सर, भोसले सर, नागिले सर ,यारोळे सर, राठोडसर, सचिन फावडे ,कलशेट्टी व व्हनशेट्टीसर आदी शिक्षक व कुसुम कलकोटे उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्तात्रय सावंत तर गिरीधर चव्हाण यांनी आभार मानले.