ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फरार आरोपींची संपत्ती जप्त करा – फडणवीसांचे आदेश

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी बातमी

मुंबई, वृत्तसंस्था 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे. तसेच बंदुकीसोबत सोशल मीडियावर ज्यांचे फोटो व्हायरल झाले आहे त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण तापलं आहे. विरोधात या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत आहे. आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे.

मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपी आतापर्यंत फरार असल्याने त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

या मोर्च्यात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे, भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षिरसागर, जितेंद्र आव्हाडसह अनेक नेते उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!