ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संविधान वाचवण्याची चिंता ; शरद पवार

मुंबई : वृत्तसंस्था

देशाने अनेक सरकार पाहिले आहे. वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती. विकासाचा विचार होता म्हणून लोकशाही टिकली होती. अलीकडे सगळी परिस्थिती बदलली आहे. सरकार गॅरंटी कसली देतेय? रोजगार कमी झाला, शेतीमालचे भाव पाडले, कांदा, ऊस, द्राक्ष यांचे भाव गडगडण्याची गॅरंटी सरकार देते काय? दिलेले आश्वासन पाळण्याची गॅरंटी का घेत नाही? केवळ आश्वासने दिली, देश वाचवायचा आहे, संविधान वाचवण्याची चिंता आहे. देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, फक्त तुमची साथ हवी आहे. बदलाची सुरुवात तुमच्यापासून करूया, अशी साद माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घातली.

निफाड येथे आयोजित महाएकजूट सभेत शरद पवार बोलत होते. मंचावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय राऊत खा. अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, कोंडाजी आव्हाड, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, हेमंत टकले, आमदार सुनील भुसारा, जे. पी. गावित, नानासाहेब बोरस्ते, श्रीराम शेटे, माजी आमदार अनिल कदम, जयंत दिंडे उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, मी केंद्रात मंत्री असताना दीड महिना पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा उपलब्ध आहे, अशी फाइल आली. त्यावर कृषीप्रधान देशात ही वेळ येणे ही दुर्दैवी बाब होती. आयातदार देशाला निर्यातदार बनविले होते. यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि दिल्लीत जाऊन ७१ हजार कोटी कृषी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. हे विसरता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!