ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेस भारत की सबसे बेईमान आणि भ्रष्ट पार्टी ; पंतप्रधान मोदी कडाडले !

मुंबई ; वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्याच्या सभेत भुयारी मेट्रो तीन मार्गिकेसह अनेक योजनांचे लोकार्पण केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी ही महा विकास विरोधी आहे अशी टीका केली. महाविकास आघाडीने अटल सेतुला रोखण्याचा प्रयत्न केला. यांनी बुलेट ट्रेनचं एकही काम होऊ दिले नाही. भुयारी मेट्रोच्या कामात देखील खोडा घातला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. महाराष्ट्राच्या विकासाच्या विरोधात असलेल्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर शेकडो मैल दूर ठेवायला हवे असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

कॉंग्रेस भारत की सबसे बेईमान आणि भ्रष्ट पार्टी आहे. कोणताही काळ असो कॉंग्रेसचे चरित्र बदललेले नाही. याच आठवड्याचा विचार केला तर कॉंग्रेसचा एक मुख्यमंत्री जमीन घोटाळ्यात अडकला आहे. त्याचे एक मंत्री महिलांना शिव्या देत आहेत.त्यांचा अपमान करीत आहेत. हरियाणात कॉंग्रेस नेते ड्रग्ज सोबत पकडले गेले. कॉंग्रेस निवडणूकी पूर्वी मोठी आश्वासनं देते आणि निवडून आल्यानंतर जनतेला लुटण्याचे एकाहून एक उपाय शोधत राहते अशीही टीका नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आज एक मोठी आंनदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ही केवळ मराठी, महाराष्ट्राचा सन्मान आहे असा नाही. हा त्या पंरपरेचा सन्मान आहे ज्यांनी देशाला अध्यात्मा, ज्ञान आणि साहित्य ही देणगी दिली आहे. नवरात्रीत मला एक मागे एक अनेक विकासकामांचं लोकार्पण करण्याचं सौभाग्य मिळत नाही. वाशिममध्ये मी देशातील ९.५ कोटी शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी जारी केला. ठाण्यात महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचा किर्तिमानाचे काम सुरु होत आहे. महाराष्ट्रा्च्या विकासाही ही सुपरस्पीड आहे.

‘महायुती सरकारने मुंबई ३० हजार कोटीपेक्षा अधिकचं प्रोजेक्ट सुरु केले आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट, नैना प्रोजेक्ट, इस्टर्न फ्री वे, ठाणे महापालिकेचे नवे मुख्यालय याचं उद्घाटन आज होत आहे. हे विकासकार्य मुंबई आणि ठाण्याला आधुनिक ओळख देतील. मेट्रोची सुरुवात ही आज होत आहे. मुंबईच्या लोकांना अधिक महिन्यांपासून याची वाट पाहत होते. जपान सरकारचे ही मी आभार व्यक्त करतो. त्यांनी या कामात खुप मदत केली आहे. ही मेट्र्रो भारत -जपान मैत्रीचं प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्याशी वेगळं नातं होतं. विकसित भारत हे आमचं एकच लक्ष्य आहे. आमच्या सरकारचं प्रत्येक काम विकसित भारतसाठी समर्पित आहे.’

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!