अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथील काही ग्रामस्थांच्या रेशनकार्डची मोठी दुरावस्था
झाली होती.कित्येकांचे फाटले होते,तर काहींकडे नव्हतेच ! ही बाब ज्यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची
कन्या शितल म्हेत्रे यांना कळाली.त्यावेळी त्यांनी तात्काळ सलगर गावात समाधान शिबीराचे आयोजन करत हा प्रश्न तातडीने सोडविला.त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान
व्यक्त होत आहे.यापुढे या भागातील अनेक प्रश्न आपण मार्गी लावू. तालुक्याच्या विकासासाठी सदैव म्हेत्रे
परिवार आणि मी कटिबद्ध आहे,अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.
शासकीय कामात प्रत्येक ठिकाणी रेशनकार्डची सक्ती करण्यात आली आहे.मात्र कार्ड अभावी
कामात अडथळा येत होता.वंचितांची संख्या फार मोठी होती.यावर तोडगा काढत शितल म्हेत्रे यांनी सलगरकरांना मोठा आधार दिला आहे.यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा गुंडरगी होत्या.व्यासपीठावर माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे,महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगल पाटील,प्रविण शटगार,सातलिंग गुंडरगी,अशोक पाटील,संजय डोंगराजे,बसवराज चिकमळ,अशोक वरदाळे,भीमाशंकर जमादार उपस्थित होते.यावेळी सलगरमधील पाणंद
रस्ता व अंतर्गत रस्त्याचे भुमिपुजन माजी आमदार म्हेत्रे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पार पडले.या समाधान शिबिरामुळे रेशनकार्डसाठी होणारी पायपीट,वेळ व खर्चात बचत झाली आहे,असे म्हेत्रे यांनी सांगितले.यावेळी संगप्पा शेळके,मल्लिनाथ भासगी,कांतु शटगार,सैपन लालखाॅ,काशिनाथ चिकमळ,विश्वनाथ गुंडरगी,नागण्णा चुंगी,दौलप्पा म्हेत्रे,श्रीशैल रोडगीकर यांच्यासह
ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक लोकांना
रेशनकार्ड वाटप
सलगरमध्ये अनेक कुटूंबे ही रेशनकार्डअभावी चिंतेत होती.मात्र म्हेत्रेंच्या पाठपुराव्यातुन समाधान शिबीर घेण्यात आले.यातुन रेशनकार्डचा प्रश्न मार्गी लागला.सदरच्या कार्यक्रमात ९० कुटूंबांना प्रातिनिधीक
स्वरूपात रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.