मुंबई : वृत्तसंस्था
देशातील हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातील काँग्रेस आघाडीवर होती. मात्र काही वेळाने भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंतिम निकालावेळी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला
मोदी, अमित शहा आणि अमित शहा यांचा पक्ष पराभूत होत आहे. मी जिंकण्याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे, असे सेनी काल म्हणाले होते. त्यांनी नेमका काय बंदोबस्त केला ते पहावे लागेल. भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पराभूत होत आहे. मोदींचा कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. हरियााणात भाजप विरोधी लाट आहे. अंतिम निकालावेळी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
जिथे भाजपची सत्ता आहे त्याठिकाणी शेवटच्या फेरीपर्यंत मागे पुढे सुरू असते. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सेनी यांनी कालच म्हटले होते, मी जिंकण्याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे. त्यांनी काय बंदोबस्त केला तो आम्ही बघून घेऊ. पण सध्या हरियाणामध्ये भाजप, मोदा आणि अमित शाह विरोधात लाट आहे आणि तेथील जनता यावेळी कोणत्याही परिस्थिती भाजपला निवडून देणार नाही. निवडणुकीचे कल सध्या येणे सुरू आहे. हरियाणात काँग्रेस आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरेन्स आघाडीची सरकार येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
जम्मू काश्मीरमध्ये 370 सह इतर मोठमोठ्या गोष्टी करत होते, अखेर काश्मीरच्या जनतेने मोदी, अमित शहा आणि भाजपला राज्यातून हद्दपार केले, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेश, गुजरातसह कोणत्याही राज्यात निवडणूक घेतली तरी भाजपचा पराभव निश्चित आहे. मोदींचा कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकतील आणि भाजपचा पराभव होईल, असेही संजय राऊत म्हणाले.