ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोर्न फिल्म बनवणाऱ्याचा पोलिसांनी उधळला कट ; १८ जण अटकेत

लोणावळा : वृत्तसंस्था

शहराजवळच मळवली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका खासगी बंगल्यात पोर्न फिल्म बनवण्याचा उद्योग करणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून फिल्म अर्थात चित्रफीत बनवण्यासाठी लागणाऱ्या ६ लाख ७२ हजार ६२० रुपये किमतीच्या मुद्देमालासह १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पाटण गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या आर्णव व्हिला (ता. मावळ, जि. पुणे) या एका खासगी बंगल्यात अश्लील व्हिडीओ तयार करण्याचा उद्योग सुरू असल्याची गोपनीय खबर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक तयार करून तत्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांना या बंगल्यात बीभत्स चित्रफीत तयार करत असलेली मंडळी रंगेहाथ मिळून आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून ५ महिला आणि १० पुरुषांसह हा बंगला बेकायदेशीरपणे भाड्याने देणाऱ्या आणि तो चालवणारे ३ जण अशा एकूण १८ जणांना ताब्यात घेऊन चित्रफीत तयार करण्यासाठी वापरलेले दोन कॅमेरे, वेगवेगळ्या लाईट, वायरलेस माईक, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीसचे पो.उप.नि. भारत भोसले यांनी याप्रकरणी सरकारी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून विष्णू व मुन्नासाहब साओ (३०, रा. परगना, कोलकाता), जावेद हबीबुल्ला खान (३५, रा. बस्ती, उत्तर प्रदेश), अलका राज के राजन (२३, रा. . रंगपुरी, साऊथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (३८, रा. मुजफानगर, उत्तर प्रदेश), रिया वासु गुप्ता (२१, रा. दिल्ली), बुद्धसेन बरदानीलाल श्रीवास (२९, रा. चंद्रपूर), समीर मेहताब आलम (२६, रा. अमरोहा, उत्तर प्रदेश), अनुप मिथिलेश चौबे (२९, रा. कांदिवली, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (२१, रा. हरयाणा), वीणा भारत पोवळे (३२, रा. खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (२८, रा. नालासोपारा वेस्ट, पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (३८, रा. वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (१९, सुरत, गुजरात), वंशज सचिन वर्मा (२१, रा. डेहराडून) आणि मनीष हिरामण चौधरी (२०, रा. शास्त्रीनगर, हरयाणा) यांना प्रथम ताब्यात घेऊन त्यातील १३ पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या सर्वांच्या विरोधात अश्लील चित्रिकरण करून त्या चित्रफिती अवैध वेबसाईट्स व मोबाईल अॅप्लिकेशनवर अपलोड करून प्रचार व प्रसार करण्याची व्यवस्था केल्याचा गुन्हा भादंवि कलम २९२, २९३, ३४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कायदा कलम ६७, ६७ (अ), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम १९८६ कायदा कलम ३, ४, ६, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सुखदेव चांगदेव जाधव (५२), आकेश गौतम शिंदे (३२) व सनी विलास शेडगे (३५, सर्व रा. मळवली, ता. मावळ, जि. पुणे) यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ओळखपत्रे न घेता बंगल्यात पुरुष व त्यांच्या सोबतच्या महिलांचे अश्लील वर्तन करतानाचे तसेच नग्न चित्रिकरण करून त्याच्या चित्रफिती तयार करत असल्याचे माहिती असताना देखील त्याबाबत पोलिसांना माहिती न देता तो भाड्याने दिल्याचा आरोप ठेवत तिघाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!