ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगेंना जिवे मारण्याचा कट;‎ ‘त्या’ दोघांना ५ दिवसांपर्यंत कोठडी !

मुंबई : वृत्तसंस्था 

गेल्या दोन दिवसापासून राज्यात मनोज जरांगे यांना जिवे‎ मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना आता मनोज जरांगे यांना जिवे‎ मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणी ‎गोंदी पोलिस ठाण्यात दोन ‎आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ‎‎आला आहे. या प्रकरणातील‎ आरोपींना गुरुवारी अंबड‎न्यायालयात हजर केले असता,‎त्यांना सहा दिवसांची पोलिस‎कोठडी सुनावण्यात आली आहे. ‎‎दरम्यान, पोलिसांनी रात्री जवळपास ‎‎सलग सहा तास आरोपींची चौकशी ‎‎केली आहे. उपलब्ध रेकॉर्डिंगच्या‎शब्द न शब्दाचा आरोपींशी‎संवादावर तपासाबाबत अहवाल‎केला आहे. या दोन्ही आरोपींना ‎‎न्यायालयात हजर केले असता,‎त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस‎कोठडी सुनावण्यात आली आहे.‎दादा गरुड आणि अमोल खुने अशी ‎‎ताब्यात असलेल्या आरोपींची नावे ‎‎अाहेत.‎

मराठा समाज आंदोलक मनोज ‎‎जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा‎कट रचल्याप्रकरणी दोन आरोपींना‎जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या‎पथकाने ताब्यात घेतले आहे. यात‎मनोज जरांगे यांच्या वतीने‎पोलिसांना काही रेकॉर्डिंगही देण्यात‎आली आहेत. ज्या रेकॉर्डिंग देण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आली त्यानुसार पोलिसांनी‎आरोपींकडून प्रत्येक शब्दाबाबत‎कसून चौकशी सुरू आहे. हे आरोपी‎आता १२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस‎कोठडीत राहणार असल्याने‎पोलिसांना या आरोपींकडून अजून‎माहिती मिळणार आहे.‎

दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार आरोपी‎व अजून कुणाचा संवाद झालेला‎आहे का, जिवे मारण्याचा ज्या‎प्रकारचा कट होता त्यात अजून‎कुणी सहभागी आहे का, या विविध‎तपासांसाठी पोलिस कोठडी‎मिळाली आहे. न्यायाधीशांनी यात‎दोन्ही आरोपींना सहा दिवसांची‎पोलिस कोठडी सुनावली आहे.‎दरम्यान, आरोपीच्या वतीने कुणीही‎वकील न आल्यामुळे जिल्हा विधी‎सेवा प्राधिकरणकडून वकिलाची‎नेमणूक करण्यात आली आहे.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!