चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २ हजार मुलांना कोरोना लसीचे उद्दिष्ट; सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना शासनाने कोर्बोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस सुरू केली असून ही लस घेण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन
चप्पळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी केले.अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या १८ गावांमध्ये
हे लसीकरण सुरू झाले आहे.प्रत्येक गावच्या सरपंचांनी पुढाकार घ्यावा.पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी ५२ जणांना लस देण्यात आली.या मोहिमेत एकूण २ हजार ५४
मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे,असे आरोग्य सहाय्यक परमेश्वर बिराजदार यांनी सांगितले.कोविडवरील लस मुलांसाठी अतिशय सुरक्षित आहे ती घेण्यास मुलांनी काही हरकत नाही,युवा नेते बसवराज बाणेगाव यांनी सांगितले.प्रारंभी कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन बसवराज बाणेगाव व सुरेश सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी सुभाष कांबळे ,आरोग्य सहाय्यक परमेश्वर बिराजदार,श्रीधर नडीमेटला,आरोग्य सेविका गीता पडवळ,
सुरेखा कांबळे,जयश्री सोनकांबळे आरोग्य सेवक बाबुराव शिरसट,इस्माईल इनामदार,सिद्धेश्वर चटमुटगे,सुनील माशाळे,आशा गटप्रवर्तक हताळे आशा वर्कर म्हमाणे,सुरवसे,कांबळे,आगावणे,बाळगे, कोळी,मनोज कांबळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदिप सुरवसे यांनी तर आभार विजय कोरे यांनी मानले.