कोरोना संकटात पुण्याचे माजी उपमहापौर आले अक्कलकोटकरांच्या मदतीला ! ५० ऑक्सिजन बेड देण्याचा घेतला निर्णय
अक्कलकोट,दि २९ : स्वामी भक्त आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर दिपक मानकर हे कोरोना संकटात अक्कलकोटकरांच्या मदतीला धावून आले आहेत.त्यांनी शहर आणि तालुक्याची गरज लक्षात घेऊन तातडीने
५० ऑक्सीजन बेड देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.संकटकाळी घेतलेल्या
या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.अक्कलकोट शहर आणि तालुक्याला कोरोनाने ग्रासले आहे.मृत्यचे प्रमाण वाढले आहे अशा संकटांचा सामना कसा करावा यासाठी सर्जेराव जाधव सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी, फतेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मारूती बावडे, युवााा कार्यकर्ते शिवराज स्वामी, डॉक्टर असोसिएशनचे डॉ.प्रदीप घिवारे, डॉ. राजेंद्र पाटील ,डॉ. विपूल शहा, डॉ. प्रमोद मजगे, डॉ. गिरीश साळुंखे,माणिक बिराजदार यांनी व्यापक बैठक घेऊन रूग्ण सेवेसाठी कार्य करण्याचे ठरविले.त्यातून विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधण्यात आला.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यात पूणे महापालिकेचे माजी उपमहापौर दिपक मानकर यांनी जे निस्सीम स्वामी समर्थ भक्त आहेत त्यांनी ५० ऑक्सिजन बेड सेवा दान देण्याचे मान्य करून वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या श्री स्वामी समर्थ महाराज रूग्णालयात हे बेड दिले
जाणार आहेत. डॉ. मनोहर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा केली जाणार आहे.याकामी शिवाजी मानकर आणि दत्ता सागरे यांचे सहकार्य मिळाले.परिणामी रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे तर नागरिकांतून समाधान व्यक्त होत
आहे.
कोरोनाविरुद्ध
सर्वांनी मिळून लढूया
हे संकट मोठे आहे.याचा सामना आपण सर्वांनी मिळून करायचा आहे.त्यासाठी प्रत्येकाचे योगदान हवे आहे.सर्वांनी मिळून जर एकत्रित आपण प्रयत्न केले तर हा लढा आपण निश्चितच जिंकू शकू.
दिलीप सिद्धे,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी