ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना ही गेल्या शतकातील सर्वात मोठी महामारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून भारतातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भारतातील सध्याची परिस्थिती आणि सरकारने केलेल्या उपाययोजना याबद्दलची विस्तृत माहिती दिली. त्याबरोबरच २३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितलं.

कोरोना लढ्यातील सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे कोरोनाचे नियम पाळणे, मास्क, सुरक्षित अंतर पाळणे हे आवश्यक आहेत. लस हे सुरक्षा कवच आहे. लसनिर्मिती करणारे देश आणि कंपन्या जगात बोटावर मोजण्या इतक्याच असल्याचं मोदी म्हणाले.

पुढच्या दोन आठवड्यामध्ये अठरा वर्षांच्यावरील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी देशातील सर्व राज्यांना १००% लसी केंद्र सरकार मोफत पुरवेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

भारतातच लसींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपण इतरही देशांना लसींचा पुरवठा करत आहोत, ही देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवलं. त्याबरोबरच परदेशी कंपन्यांबरोबर करार केले असून परदेशी लसी भारतात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!