ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाचा उद्रेक तरीही जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरूच !संसर्ग वाढण्याची भीती,कार्यालय बंद करण्याची मागणी

अक्कलकोट, दि.१५ : राज्यात सध्या कडक निर्बंधासह संचारबंदी लागू आहे.
पण सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरूच असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे.
येथून देखील मोठा संसर्ग होण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत असल्याने ही कार्यालये संचारबंदीच्या काळात बंद ठेवण्याची मागणी विविध संघटना आणि नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.

सध्या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात दुय्यम निबंधक कार्यालय ५० टक्के क्षमतेने
सुरु करण्यास शासनाने परवानगी
दिली आहे.असे असताना अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना घरातून बाहेर पडण्याची बंदी देखील राज्य सरकारने
केली आहे.एकीकडे बंदी आणि दुसरीकडे शासकीय कार्यालय सुरू हा काय प्रकार आहे,असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी ही दुय्यम निबंधक कार्यालय आहेत.या ठिकाणी संचार बंदीचा काहीच परिणाम दिसून येत नाही.अक्कलकोटमध्ये तर सॅनिटायझरचा वापर होत नाही, मास्कचा वापर नाही तसेच सोशल डिस्टन्स चे देखील पालन होत नाही,ही वस्तुस्थिती असताना संबंधित प्रशासन या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे.या दुय्यम निबंधक कार्यालयातून शासनाला महसूल जरी मिळत असला तरी सरळ सरळ नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे,अशी चर्चा नागरिकांतून केली जात आहे.सध्या संचारबंदी असल्याने पुणे, मुंबई या ठिकाणाहून लोक अजूनही या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येत आहेत.

एकीकडे लोकांना रस्त्यावर येण्यास बंदी तर दुसरीकडे कार्यालय सुरू त्यामुळे नागरिक बाहेर पडण्यास संभ्रमावस्था आहे.मागच्या लॉकडाऊन वेळी ही कार्यालय पूर्णपणे बंद होती.आता मात्र सुरू असल्याचे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त आहे.याठिकाणी बाहेरच्याकडून इथल्या नागरिकांना किंवा इथल्या नागरिकांकडून त्यांना संसर्ग होण्याची भीती कायम आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने याबाबत निर्णय घेऊन कार्यालय बंद करण्याचे आदेश काढावेत आणि संभाव्य संसर्गाचा धोका कमी करावा,अशी मागणी नागरिकांतुन होताना पहायला मिळत आहे.

★ नागरिकांच्या जीवाशी खेळ !

शासनाला नुसता महसूल हवा आहे.लोकांच्या जीवाशी काही देणे घेणे नाही,अशी टीका नागरिकांतुन केली जात आहे.केवळ या कार्यालयातुन महसूल मिळतो म्हणून जर सुरू ठेवली जात असतील तर मग व्यापाऱ्यांचा दोष काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!