अक्कलकोट : अक्कलकोट शहरात सलग तिसऱ्या दिवशी अनेक चौकांमध्ये कोरोना चाचणी सुरू आहे. याठिकाणी नगरपालिकेने एक स्वतंत्र पथक तयार केले असून जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत आणि विना मास्क रस्त्यावर दिसत आहेत त्यांना कुठेही माफ केले जात नाही. त्यांना पकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये रुग्ण संख्या वाढत चालल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे स्पष्ट आदेश नगरपालिकेला मिळालेले आहेत.त्याचाच आधार घेत ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात रुग्ण संख्या कमी असली तरी ग्रामीण भागातून शहरात येणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे.त्यामुळे तपासणी मोहीम राबवली जात आहे,असे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले.
अक्कलकोट नगरपरिषदेने वागदरी रोडवर पुलाखाली चाचणी ठेवली होती.त्यात ९० जणांची चाचणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील, बांधकाम विभागाचे मल्लया स्वामी, प्रविण सावंत यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.