---Advertisement---

अक्कलकोट शहर संघर्ष समितीतर्फे उद्या नगरपरिषद विरोधात बोंबाबोंब आंदोलन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : शहरातील रखडलेल्या विविध विकास कामासंदर्भात सोमवार
दि.९ ऑगस्ट रोजी अक्कलकोट येथे पक्षविरहित अक्कलकोट शहर संघर्ष समितीच्यावतीने बोंबाबोंब व हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोट शहर संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत अविनाश मडिखांबे, प्रसाद माने, अमर शिरसाट, केरबा होटकर, अंकुश चौगुले, अंबादास कामनुरकर, भीमाशंकर गिर्बोने, निवृत्ती पारखे, सिध्दाराम माळी,ज्योतिबा पारखे, अंबादास कांबळे, सुरेश सोनकांबळे आदी अक्कलकोट शहर संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

किणी रोड स्मशानभूमी येथील बगीचा आरक्षण कायम स्वरुपी हटवून दफनभूमी व स्मशानभूमी अशी नोंद करावी, कोरोना काळातील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात यावी, प्रिय दर्शनी मंगल कार्यालय तात्काळ सुरु करावे, अक्कलकोट शहरातील रखडलेल्या पाणी टाकीचे बांधकाम त्वरित सुरु करण्यात यावे, अक्कलकोट शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा, बेडरगल्ली येथील शौचालयाचे काम त्वरित पूर्ण करावे, अपंग व अल्पभूधारक यांना  नगरपरिषद गाळे आरक्षित करण्यात यावे, अक्कलकोट शहरातील सर्व  बगीचांचे सुशोभीकरण करणे, आठवडा बाजार करिता येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अक्कलकोट शहरात जंतूनाशक फवारणी करणे, विजयसिंह राजे भोसले व्यापारी संकुलन राहिलेल्या गाळ्याचे फेर लिलाव करणे, शहरातील गटारीवर स्लॅब घालण्यात यावे, ए-वन चौकातील गाळे धारकांना गाळे पाडण्या संदर्भात नोटीस बजावण्यात आलेल्यांना पर्यायी व्यवस्था करण्यात यावे.

आदी रखडलेल्या मागण्या संदर्भात सोमवारी अक्कलकोट नगरपरिषदेच्या विरोधात अक्कलकोट शहर संघर्ष समितीच्यावतीने हलगीनाद व बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!