मुंबई: राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढायला लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात कोरोना लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. करोना लसीबाबत महाविकास आघाडीतील वरिष्ठ मंत्रीच गैरसमज पसरवित आहे. मंत्री नवाब मलिक यांनी कोरोना लसीकरणाबाबत संभ्रम पसरविले आहे, त्यावर काय कारवाई करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झालेले नाही, दुष्प्रचाराच्या परिणामामुळे लसीकरण होत नाही, त्यामुळे कोरोना वाढीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे आरोप त्यांनी केले आहे.
राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्रीच जेव्हा कोरोना लसीकरणावर प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार?@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/tSb6HaL0Sl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 17, 2021
महाराष्ट्रातील कोरोना वाढीचे कारण महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.