ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनामुक्त कडबगाव ग्रामपंचायतीचा सीईओने केला गौरव, दोन्ही लाटेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यात ग्रामस्थ यश‍स्वी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव ग्रामपंचायतीने अथक परिश्रम घेऊन कोरोनाच्या दोन्ही लाटेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यात
यशस्वी झाल्याने कडबगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने यथोचित सन्मान करुन गौरव करण्यात आला. कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत कडबगाव ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यासाठी अधिकाऱ्यांचा गाव भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष म्हणून कडबगावचे सरपंच रमेश पाटील हे उपस्थित होते.

गाव भेट कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, माजी सभापती महिबुब मुल्ला, गट विकास अधिकारी ऐवळे, गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे, प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड, विस्तार अधिकारी तुळजापुरे,ग्रामविकास अधिकारी प्रेमदास पवार,पोलिस पाटील महानंदा माळी आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कडबगाव कोरोनामुक्त ठेवणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान करुन गौरव करण्यात आला. कडबगाव सध्या तालुक्यात कोरोना महामारीच्या दोन्ही लाटेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यात यशस्वी झाल्याने तालुक्यात एक आदर्श गाव म्हणून उदयास येत आहे. यासाठी सरपंच रमेश पाटील, उपसरपंच, समीना ढाले, तंटामुक्त अध्यक्ष सोमनाथ शटगार, पोलीस पाटील महानंदा माळी, ग्रामपंचायत सदस्य महादेव बड्डूरे, मलकप्पा सुतार तसेच सर्व सदस्य आदी पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करुन अभिनंदन करण्यात आले.

अक्कलकोट तालुक्यात कडबगाव हे गाव कोरोनामुक्त यादीत समाविष्ट झाल्याने तालुक्यात कडबगावचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. कोरोना महामारीच्या दोन्ही ही लाटेत गावात रुग्ण आढळून न आल्याने, गाव पातळीवर काय उपायोजना केल्या व गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी काय काळजी घेतली. आणि  गावात शासनाच्या कोणकोणते-अभियान राबवण्यात आले.या संदर्भात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!