अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त न्यासाच्या परिसरातील श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिरकणी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अलकाताई जन्मेजयराजे भोसले व सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भोंडला कार्यक्रम शकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
न्यासाच्या परिसरातील श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भोंडला कार्यक्रमात विविध प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. याप्रसंगी महिलांचा दांडिया नृत्य मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या आराधनेने करण्यात आली. यामध्ये ‘ऐैलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा’. यासह गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी शीतलताई म्हेत्रे, मल्लम्मा पसारे, रुपाली शहा, मीनल शहा, डॉ.असावरी पेडगावकर, डॉ.पवित्रा मलगोंडा, संगीता राठोड, सोनल जाजू, दर्शना लेंगडे-खोबरे,कोमल क्षीरसागर व हिरकणी संस्थेच्या खजिनदार स्मिता कदम, सदस्या स्वाती निकम, पल्लवी नवले, संगिता भोसले, उज्वला भोसले, पल्लवी कदम, धनश्री पाटील, कविता भोसले, अंबूताई पवार, छाया पवार, राजश्री माने, क्रांती वाकडे व सभासद कविता वाकडे, शिला मचाले, साधना मचाले, ज्योती मोरे, सुषमा माने, प्रीती रणसुभे, नीता सूर्यवंशी, शुभांगी घाडगे, सचिता पाटील, पूर्वा मोरे, सोनाली पाटील, माधुरी लिंबीतोटे, निर्मला साठे, रुपाली पवार, प्रमोदिनी सूर्यवंशी, स्वपना कुंभार, शोभा पोळ, सुवर्णा घाडगे, तृप्ती बाबर, प्रेरणा पाटील यांच्यासह न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.