अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जेऊर रोड अक्कलकोट येथील संस्थान हिरेमठ शिवगिरी समर्थ नगर येथे येत्या २३ मार्च रोजी श्रीमद रंभापुरी वीरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशीकेंद्र शिवाचार्य यांची धर्मसभा,दर्शन सोहळा आदिंसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, संस्थान हि रेमठ गौडगाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.यानिमित्त सायंकाळी साडेपाच वाजता कुंभ कळसाने स्वागत केले जाईल.त्यानंतर सायंकाळी सहा वाजता जगद्गुरूंच्या उपस्थितीत धर्मसभा होईल.
त्याचे नेतृत्व शिवाचार्यरत्न डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी करतील.यावेळी नाविदगी मठाचे श्री.ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ यांची उपस्थिती असेल.या कार्यक्रमास ष. ब्र.श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ,अभिनव चन्नमल्ल शिवाचार्य स्वामीजी तेरीनमठ,जयशांतलिंगाराध्य शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ, शांतवीर शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ, सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ, म.नि. प्र शिवानंद स्वामीजी विरक्त मठ करजगी,अभिनव शिवलिंग स्वामीजी, म.नि.प्र.बसवलिंगस्वामीजी,अक्कलकोट, डॉ.शांतलींग स्वामीजी,प्रभू प्रशांत स्वामीजी, धुळी महाराज शिरवळ आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.याशिवाय या धर्मसभेस आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दत्तात्रय पाटील, राजशेखर शिवदारे,ऍड.मिलिंद थोबडे, अरुण पाटील,लक्ष्मीकांत पाटील, नितीन गुत्तेदार, महेश हिंडोळे, शिवानंद पाटील,संजय देशमुख,महादेव कोगनुरे,मल्लिकार्जुन पाटील, मल्लिनाथ स्वामी ,दिलीप सिद्धे,आनंद तानवडे, ईश्वर झुंजा, एस.बी पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.
या धर्मसभेमध्ये डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी लिखित सत्यम शिवम सुंदरम या लेखाच्या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.या कार्यक्रमासाठी वीरशैव महिला मंडळ, ज. रेणुकाचार्य अक्कनबळग, सखी मंच आणि निसर्ग फाउंडेशनचे विशेष सहकार्य मिळत आहे. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेस एड.अनिल मंगरूळे, योगीराज हिरेमठ,गिरीश पट्टद,शिवशंकर चनशेट्टी,आनंद खजुरगीकर, मोनेश्वर नरेगल, ईश्वर माशाळकर, एम.बी. पाटील, चंद्रकांत स्वामी,लक्ष्मण समाणे आदी उपस्थित होते.