वटवृक्ष मंदिरात दत्त जन्मोत्सव भक्तीभावाने संपन्न, पाळणा कार्यक्रमाने भाविकांना लाभला दत्त जन्मोत्सवाचा आनंद
अक्कलकोट, दि.१८ डिसेंबर – कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंट संसर्गाच्या पाश्वभुमीवर अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शनिवारी दत्त जयंती उत्सव व श्रीदत्त जन्मोत्सव अनेक भाविकांच्या उपस्थितीत भक्ती भावाने संपन्न झाला.
पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित व्यंकटेश महाराज पुजारी यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकडआरती संपन्न झाली. सकाळी ११ : ३० वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता सौ. उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली दत्त जन्म आख्यान झाले.
यानंतर दत्त नामजप व सायंकाळी ६ वाजता पुरोहित व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पाळणा पूजन व दत्त जन्मोत्सव तसेच मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन अनेक भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा ज्योतीबा मंडपात संपन्न झाला.
याप्रसंगी पाळणा कार्यक्रमाने भाविकांना दत्तजन्म उत्सवाचा आनंद लाभला. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, प्रदीप हिंडोळे, उज्वलाताई सरदेशमुख, बाळासाहेब घाटगे, बंडेराव घाटगे, सागर गोंडाळ, भीमाशंकर गुरव, श्रीनिवास इंगळे, राजू गव्हाणकर, अण्णा सावंत, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धू कुंभार, काशिनाथ इंडे, रविराव महींद्रकर, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, अविनाश क्षीरसागर, जयसिंह इंगळे, संजय पवार, व सत्संग महिला भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.