ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाढदिवस विशेष : शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणारे नेतृत्व : दत्ताभाऊ शिंदे

 

भारत हा कृषिप्रधान देश आहे.या देशात
आणि राज्यात शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी असे मानले जाते परंतु कधी निसर्गाचा लहरीपणा,कधी वैयक्तिक संकटामुळे शेतकरी हा कायम संकटात राहिला आहे परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात नवी उमेद,नवी क्रांती,नवा उत्साह निर्माण करणारे नेतृत्व म्हणून आज गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ताभाऊ शिंदे यांच्याकडे
पाहिले जात आहे.तसा दत्ताभाऊ शिंदे यांना वडील बलभीमभाऊ शिंदे यांचा राजकीय वारसा आहे.हा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे टिकवत कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासले आहे.अत्यंत कमी वयात,अधिक जबाबदारी पेलत कारखानदारीच्या क्षेत्रात
नवी क्रेझ निर्माण केली आहे.विशेष म्हणजे या क्षेत्रात त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.म्हणून या कारखान्याचे गाळप हंगाम हे दरवर्षी यशस्वी होताना दिसत आहेत.तसे पाहिले तर यावर्षी कारखानदारी अडचणीत आहे.उसाच्या एकरी उत्पादनात
घट झालेली असताना त्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिल वेळेवर देऊन ५ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळप करून वेगळे स्थान निर्माण केले आहे.गेली अनेक वर्ष आज ते कारखान्याचे चेअरमन म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत.तसे पाहिले तर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरचा काही भाग हा कायम दुष्काळी मानला जातो परंतु या क्षेत्रात कुरनूर धरणामुळे उसाचे क्षेत्र वाढले याचाच विचार करून त्यांनी कारखानदारीमध्ये पडून शेतकऱ्यांचा अर्थिक स्तर सुधारण्याचा प्रयत्न केला.

मध्यंतरी त्यांचे काका स्व.भगवानभाऊ शिंदे यांचे अचानक निधन झाले.त्यावेळी कारखाना संकटात होता परंतु शिंदे परिवारावर राजकारणातील वरिष्ठ नेते मंडळींचा जो विश्वास होता.त्यामुळे ते पुन्हा एकदा कमी कालावधीत उभारी घेऊन कारखाना सुस्थितीतून आणला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवे पर्व सुरू केले.आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील,माजी मंत्री हसन मुश्रीफ,माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री राजेश टोपे,धनंजय मुंडे,सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.गेले अनेक वर्षे त्यांच्याबरोबर आता स्नेहभाव त्यांनी जपला आहे.विशेषता गोकुळ शुगर हा जो कारखाना आहे तो अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असलेला आहे.कारखानदारीच्या क्षेत्रात या कारखान्याचे मोठे नाव आहे.हे पाहण्यासाठी खास माजी आरोग्य मंत्री
राजेश टोपे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याला सदिच्छा भेट दिली होती.यावरून पवार घराणे आणि शिंदे घराणे यांची जवळीकता सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकते.आज कारखान्याच्या क्षेत्रात काही जरी संकट आले तरी ते बाहेर पडू शकतात इतकी ताकद त्यांची आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी आणि तालुक्यातील जनतेसाठी त्यांच्या अनेक संकल्पना आहेत त्या लवकरच दृष्टीपथात येतील.मध्यंतरी माजी मंत्री धनंजय मुंडे हे कारखान्यावर आले होते.त्यावेळी दत्ताभाऊ शिंदे यांच्या नेतृत्व कौशल्याबद्दल तोंड भरून कौतुक केले होते.या सर्व संबंधावरून आता त्यांचे राजकीय क्षेत्रातील वलय वाढत आहे. आज दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुका तसेच मराठवाड्याचा काही भागात गोकुळ परिवाराविषयी वेगळे आपुलकी निर्माण झाली आहे त्याला कारण दत्ता शिंदे यांचा स्वभाव देखील आहे.ते अतिशय हळव्या मनाचे आहेत.दुसऱ्यांना नेहमी मदत करण्याची भूमिका घेतात आणि त्यांचा धाडसी स्वभाव आहे.एखाद्या वेळेला मदत करत असताना ते स्वतःची कधीही पर्वा करत नाही हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे म्हणून आज तरुण वर्ग देखील त्यांच्याकडे मोठ्या नजरेने मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.उद्या तालुक्याचे नेतृत्व करण्याची जर वेळ आली तर आपण पुढे यावे,असा सूर आता गावोगावी तरुणांमधून ऐकायला मिळत आहे.हे करत असताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांची मोठी साथ त्यांना लाभली आहे.मागच्या दोन वर्षात तुळजापूर, नळदुर्ग भागातील शेतकऱ्यांच्या उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.यावर उपाय करत दत्ताभाऊंनी नळदुर्गचा तुळजाभवानी कारखाना चालविण्यास घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
हा देखील त्यांचा धाडसी निर्णय म्हणावा लागेल.आज शिंदे घराण्याच्या इतिहासावर जर एक नजर टाकली तर बाजार समिती,जिल्हा परिषद ,पंचायत समिती,ग्रामपंचायत, कारखानदारी या सर्व क्षेत्रात शिंदे घराण्याने राज्य केले आहे परंतु आता विधानसभेचे स्वप्न एक अधुरे राहिले आहे.या दृष्टीने विचार केल्यास दत्ताभाऊ शिंदे यांनी कारखानदारी व समाज करण्याच्या माध्यमातून चालवलेले प्रयत्न हे निश्चितपणे पुढे जातील आणि यशस्वी होतील यात शंका नाही.यासाठी त्यांना कार्यकारी संचालक कपिल शिंदे,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे यांची पण मोठी साथ मिळत आहे.आज त्यांचा वाढदिवस आहे.
याच त्यांना यानिमित्ताने शुभेच्छा !

अभिजित गुंड,सोलापूर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!