ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात राष्ट्रीय “नायपर” संस्थेची मागणी – खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर १० मार्च : सोलापूर शहर-जिल्हा आता अनेक दृष्टीने विकसित होत असून शैक्षणिकदृष्ट्या सोलापूरचे महत्व वाढविण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थेची गरज आहे. सोलापूर हे मेडिकल हब, दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सोलापुरात राष्ट्रीय दर्जाच्या संशोधनपर आधारित शैक्षणिक संस्थेची गरज असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च (नायपर) या शाखेची स्थापना करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केली. याबाबतचे निवेदन केंद्रीय रसायन व खत मंत्री सदानंद गौडा यांना याबाबतचे निवेदन दिले.

सोलापूर शहर हे आपल्या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्मार्ट सिटी या अंतर्गत विकसित होत आहे. सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटनाबरोबर मेडिकल हब तथा एक शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. शहरांमध्ये एका जिल्ह्यासाठी असलेले विद्यापीठ तसेच विविध खाजगी शैक्षणिक संस्था या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, सोलापूर शहर-जिल्ह्यामध्ये आजचा पावेतो एकही राष्ट्रीय स्तरावरची शैक्षणिक संस्था उपलब्ध नाही.

गेल्या काही काळामध्ये एकूण देशभरात जाहीर झाल्या पद्धतीने “NIPER -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अँड रिसर्च” ही संस्था महाराष्ट्रामध्ये एक प्रस्तावित आहे. सध्या हाजीपूर, हैद्राबाद, मोहाली, अहमदाबाद, गुवाहाटी आणि कोलकाता या ठिकाणी हि संस्था कार्यरत आहे. त्या अनुषंगाने उत्तर कर्नाटक, आंध्र-तेलंगाना, पश्चिम महाराष्ट्रातील तथा संपूर्ण पश्चिम भारत क्षेत्रासाठी भविष्यात या राष्ट्रीय संस्थेची निर्मिती ही महत्त्वपूर्ण ठरेल. सोलापूरसह महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातील व शेजारील राज्यातील विद्यार्थ्यांना मोठी शैक्षणिक मदत होईल.

या दृष्टीने मंजुरी देऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च “नायपर” (NIPER) या शैक्षणिक प्रकल्प निर्मितीसाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!