---Advertisement---

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोविड लसीचा पहिला डोस

Follow Us:
---Advertisement---

मुंबई दि.११ मार्च : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज जे.जे रुग्णालयात सहपरिवार जाऊन कोरोनाचा कोविड लसीचा पहिला डोस घेतला. दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

 

कोरोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि, नियम न पाळल्यास काही भागात लॉकडाऊन करावे लागेल, असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी काळजी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now