नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमणात बेरोजगारी वाढली असून केंद्र सरकारला यावरून लक्ष केले जात आहे. तरुणांकडून पंतप्रधानांना ‘जॉब दो’ ही मोहीम देखील राबविली जात आहे. दरम्यान माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांनी देशातील बेरोजगारी वाढण्या मागील कारण सांगतिले आहे. २०१६ साली मोदी सरकारने कोणताही विचार न करता घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात बरोजगारी वाढली असे डॉ.मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. यावेळी त्यानी मोदी सरकारवर टीका केली आहे.
आर्थिक विषयांसंबंधित ‘थिंक टँक’ राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट स्डडिजद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विकास परिषदेच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी डॉ. मनमोहन सिंह उपस्थित होते. केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या विकासांवर दृष्टिकोन मांडण्यासाठी या चर्चेचं आयोजन करण्यात आले.
करोना संकटकाळातच महागाई आणि बेरोजगारी या मुद्यांवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष केले आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षांकडून महागाईच्या मुद्यावरून आंदोलनं केली जात आहेत. अशा वेळी डॉ. मनमोहन सिंह यांची टिप्पणी मोदी सरकारला आणखीन अडचणीत आणू शकते.