पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी विविध मागण्यासाठी पुणे शहरामध्ये सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व जाती – धर्मीय नागरिक सहभागी झाले. या मोर्चामध्ये राज्यभरातील प्रमुख नेते सहभाग झाले. तसेच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते.
आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा असल्याचे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच हवी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे. या प्रकरणात योग्य दिशेने कारवाई होणे आवश्यक असल्याचे देशमुख कुटुंबीयांनी म्हटले आहे. परभणी येथील आंदोलनानंतर आता पुणे येथील आंदोलनात देखील संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले आहेत.
एक चांगल्या आणि लोकप्रिय सरपंचाची हत्या झाली आहे. मात्र त्याचा उपयोग राजकारणासाठी कोणीही करू नये, असे आमचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ द्या. त्याचा वापर करुन यापुढे असे होऊ नये, यासाठी करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. आरोपींना मदत करणाऱ्यांना देखील आम्ही सोडणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. या प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मात्र, राजकारणासाठी अशा घटनांचा वापर होता कामा नये, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.