शासन स्तरावरील मदत करण्यासाठी कटिबध्द, सहकार क्षेत्रात आपण कायम “अप्पा” बरोबरच राहणार – आमदार सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट, दि.6 : गेल्या 8 वर्षापासून बंद असलेला स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे सुरु करीत आहेत, हे स्वागतार्ह असून याकरिता लागणारी शासन स्तरावरील मदत करण्यासाठी आपण कटीबद्द असल्याचे सांगून, या पुढील काळात विधानसभा मतदारसंघात पाटील-कल्याणशेट्टी ही अभेद्य जोडी कायम राहील, सहकार क्षेत्रात आपण कायम ‘अप्पा’बरोबर राहणार असल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
ते रविवारी स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष, वाढदिवस आणि परदेश अभ्यास दौरा यशस्वी केल्याबद्दल यासह तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे नूतन अध्यक्ष व पंचकमिटी, संचालक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी हे सत्काराला उत्तर देताना बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे होते.
दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित संचालक मंडळाच्यावतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा मानाचा फेटा, शाल, गुच्छ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, पक्षनेते महेश हिंडोळे, माजी सभापती महिबूब मुल्ला, संजीवकुमार पाटील, सिध्देश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ कोडते, सुरेश झळकी, माजी जि.प.अध्यक्ष शिवानंद पाटील, अप्पासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, कारखाना संचालक संजीव पाटील, महेश पाटील, हणमंतप्पा कात्राबाद, सिध्दप्पा गड्डी, भीमाशंकर धोत्री, देवेंद्र बिराजदार, दिलीप शावरी, दिलीप पाटील, अॅड.भिमशा पुजारी, श्रीमंत कुंटोजी, शरणबसप्पा उर्फ अप्पू बिराजदार, आकाश पाटील, विवेकानंद उंबरजे, शिवप्पा बस्सरगी, पिरोजी शिंगाडे, प्र.कार्यकारी संचालक सी.एन.मिसाळ, सचिव अशोक मुलगे, रिपाइं ता.अध्यक्ष अविनाश मडिखांबे, शिवसिध्द बुळ्ळा, राजेंद्र बंदीछोडे, संजय शरणार्थी, विश्वनाथ भरमशेट्टी आदीजण उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, बंद पडलेला कारखाना रात्रीचा दिवस करुन माजी आ.सिद्रामप्पा पाटील यांनी सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळणार असून सहकारात अप्पांनी आत्मविश्वास व श्रध्दा ठेवल्यानेच त्यांना आजवर यश मिळालेले आहे. साखर कारखाना सुरु करण्याच्या निर्णयाने पहिला मला आनंद झाल्याचे सांगून सन 1999 या काळापासून ते आजतागायत कारखान्याची जडण-घडण पाहिल्याचे सांगून पहिल्याच गळीत हंगामात अतिरिक्त तालुक्यातील ऊसामुळे शेतकर्यांच्या अडचणीच्या काळात स्वामी समर्थ साखर कारखान्याने मोठी साथ दिल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
पुढे बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले, गेल्या 8 वर्षापासून बंद असलेला कारखाना सुरु करण्याच्या प्रक्रियेत माजी आ.सिद्रामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवकुमार पाटील व संचालक यांच्याबरोबर सहभागी असल्याचे सांगून शेतकर्यांचा कारखाना पुनश्च उभा राहतोय यासाठी ऊस उत्पादकांनी स्वामी समर्थ कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे असे आवाहन केले. तालुक्यातील आगामी जिल्हा बँक, बाजार समिती, कारखाना, सहकारी संस्था या निवडणुकीत आपण अप्पांबरोबर असल्याचे सांगून अप्पा हे शब्दाला जागणारे नेतृत्व आहे. गत विधानसभा निवडणुकीत याचा मला चांगला अनुभव आहे. यंदा तालुक्यात प्रत्येक गावातून 1 लाख टन ऊस अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थिती कारखाना सुरु होत असल्याने तालुक्यातील संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय राहणार नाही. माझा घरचा देखील ऊस स्वामी समर्थ कारखान्याला देणार असल्याचे कल्याणशेट्टी म्हणाले.
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील म्हणाले, रखडलेला स्वामी समर्थ कारखाना त्यानंतरचे गळीत हंगाम व गेल्या 8 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कारखान्याबाबत त्यांनी माहिती देवून शेतकर्यांच्या हितासाठी कोणत्याही बँकेची वाट न पाहता स्वत:ची जमीन गहाण ठेवून कारखाना सुरु करीत असल्याचे सांगितले. या पुढील काळात या कारखान्याकडून उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या प्रक्रिया देखील सुरु करण्यात आलेली आहे. नजीकच्या कारखान्यापेक्षा चांगला भाव शेतकर्यांना मिळावा याकरिता माझा प्रयत्न कायम राहिल. शेतकर्यांचा हक्काच्या साखर कारखान्याकरिता ऊस देवून सहकार्य करण्याचे आवाहन सिद्रामप्पा पाटील यांनी केले. तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा खरपूस समाचारा घेतले.
याप्रसंगी कारखान्याचे माजी संचालक शिवयोगी स्वामी, महिबूब मुल्ला, महेश हिंडोळे, माजी जि.प.अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी आपल्या भाषणात पुर्न क्षमता आणि वैभव साखर कारखान्यास मिळवून देण्यासाठी सिद्रामप्पा पाटील यांच्या योगदानाबाबतची माहिती सांगून शिवानंद पाटील यांनी आजवर सहकारात केलेल्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून सांगितली. तर महेश हिंडोळे माझ्या 25 एकर ऊसापैकी 10 एकर स्वामी समर्थ कारखान्याला देवून सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तर महिबूब मुल्ला यांनी सिद्रामप्पा पाटील यांनी त्यांच्या या वयात सुरु असलेल्या कार्याबाबत कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी मल्लिनाथ दुलंगे, सूत्रसंचालन मल्लिनाथ भासगी यांनी केले.
परदेश दौरा केलेल्या आजी-माजी आमदारांच्या अभ्यास दौर्याबाबत उपस्थित जणांनी कौतुक केले. जिल्हा बँकेचे संचालक असताना सिद्रामप्पा पाटील यांनी परदेश दौरा केलेला होता.
या कार्यक्रमास शिवानंद पेडसंगी, सुधीर मचाले, स्वामीनाथ नागुरे, दत्तात्रय मुनाळे, सुधीर माळशेट्टी, मुनाफ दिवटे, अप्पा मोरे, प्रदिप जगताप, दयानंद बिडवे, निर्मला गायकवाड, प्रकाश पोमाजी, प्रकाश पाटील, धनंजय गाढवे, जगदीश बिराजदार, अशोक वर्दे, बाबा टक्कळकी यांच्यासह तालुक्यातील सोसायटी अध्यक्ष, सरपंच व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होेते.