---Advertisement---

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उद्या 6 नोव्हेंबर शेतकरी मेळाव्याचे आयोजन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट दि.5 : दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दि.6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

तसेच त्यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल, वाढदिवस अभिष्टचिंतन, परदश ब्रिटन अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्धल त्यांची यथोचित सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक संजीवकुमार पाटील यांनी दिली.

तसेच तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी संस्था अध्यक्ष, पंचकमिटी, संचालक यांचेही सन्मान करण्यात येणार आहे. सदर मेळाव्यात कारखान्याचे सध्यस्थीतीवर सुद्धा चर्चा होणार असल्याचे बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.

यावेळी संचालक महेश पाटील, दिलीप शावरी, दिलीप पाटील, प्र.कार्यकारी संचालक सी. एन. मिसाळ, सचिव अशोक मुलगे, चीफ केमिस्ट एन.एस. कुंभार, चीफ इंजिनिअर हणमंतराव रेड्डी, शिवानंद पेडसंगे, सुधीर मचाले, बाबा टक्कळकी, मल्लिनाथ भासगी आदीजण उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!