मंद्रूप : बोरामणी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांच्या मागणीनुसार व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठपुराव्याने आणि महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्न आणि शिफारसने बोरामणी गणासाठी 62 लाखाचा विकासनिधी मंजूर झाला आहे.
गेल्या साडेचार वर्षांपासून आचलारे यांनी बोरामणी पंचायत समिती गणात विविध माध्यमातून विकासनिधी खेचून आणत आहेत आमदार प्रणिती शिंदे व माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या माध्यमातून 62 लाखाचा निधी मंजूर करून आणला आहे यामध्ये येथील बोरामणीतील हुक्करे वस्ती मध्ये बंदिस्त गटार व दिव्यासाठी १२ लाख, होटगे वस्तीमध्ये पाणी पुरवठयासाठी ५ लाख, बिराजदार वस्ती ते महामार्ग ते सुरवसे घरापर्यत रस्ता करणे ५ लाख, चिरका वस्ती रस्ता करणे५ लाख, मातंग वस्तीत हायमास्ट दिवा २लाख, रोहिदास नगर येथे दोन हायमास्ट दिवा व पेविंग ब्लॉक ६ लाख, लक्ष्मीमंदिर येथे हायमास्ट दिवा व सभामंडपसाठी १२ लाख, मुस्ती येथील भीमनगर येथे रस्ता व हायमास्ट दिव्यासाठी १२ लाख, संगदरीत भीमनगरमध्ये भूमिगत गटार व पेविंग ब्लॉकसाठी १० लाख, तांदूळवाडीतील भीमनगर येथे रस्ता व दिव्यासाठी ९ लाख, वरळेगांव येथील भीमनगरमध्ये रस्ता व दिव्यासाठी १२ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यापुढील काळात देखील आणखीन विकासनिधी खेचून आणू असे आश्वासन आचलारे यांनी दिला आहे.