ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“या वयात इतके खोटे बोलायचे नसते..” फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई वृत्तसंस्था 

राज्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात अनेक टीका टिप्पणी केले जात आहेत.  राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज (दि.29) बारामती येथे बोलताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. दिवंगत उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्रात उद्योग आणणार होते. पण भाजप आणि राज्य सरकारने हे उद्योग गुजरातमध्ये नेले, असा आरोप शरद पवारांनी केला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 

या वयात इतके खोटे बोलायचे नसते…

काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी,

ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत.

तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल…

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!