ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देवस्थानच्या भक्त निवासाच्या नावाखाली होतेय भाविकांची फसवणूक ; काय आहे हा प्रकार जाणून घ्या सविस्तर !

अक्कलकोट, दि.१३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या नावाने अलीकडच्या काळात भक्त निवासाच्या नावाखाली खोटी माहिती देऊन भाविकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. अनधिकृतपणे काही ठिकाणी पैसे उकळण्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी या अशा साईटपासून सावध राहण्याचे आवाहन वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यांच्या राहण्याची सोय ही वटवृक्ष देवस्थान तसेच अन्य निवास व्यवस्थेच्या मार्फत केली जाते. भक्त निवासाच्या नावाखाली ऑनलाईन पैसे मागून फसवणूक होत असल्याची तक्रार काही लोकांनी देवस्थानकडे केली आहे. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला
आहे.

आतापर्यंत साधारण पंधरा ते वीस भाविकांनी अशा पद्धतीने फसवणूक झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाला दिली आहे त्यानंतर वटवृक्ष देवस्थाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार सायबर पोलिसांकडे वर्ग झाली असून यावरचा तपास सुरू आहे. मात्र भाविकांनी अशा पद्धतीचे कोणतेच व्यवहार अधिकृत वटवृक्ष देवस्थानच्या निवासव्यवस्थेशिवाय अन्य त्या नावाने करत असलेल्या निवास व्यवस्थेशी करू नये, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

 

भक्तांनी खात्री करून व्यवहार करावा

गेल्या २५ वर्षांपासून निवासासाठी बुकिंग पद्धतच नाही जो भाविक आधी येतो त्याला रूम दिली जाते असे असताना अक्कलकोट भक्त निवासाचा फोटो घालून दिशाभूल केली जात आहे.त्यामुळे भाविकांनी शहानिशा करावी – महेश इंगळे,अध्यक्ष वटवृक्ष देवस्थान

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!