अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांच्या अभिप्रायाच्या संकल्पनेच्या माध्यमातून अध्यावत अशी विविध कामे करणारे राज्यातले एकमेव न्यास असल्याचे मनोगत उस्मानाबाद (धाराशिव) चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर पेटकर यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात सहकुटुंब आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोटचे दिवाणी न्यायाधीश महेश पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी पर्यटन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष संदेश परकर सिंधुदुर्ग यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लिट्ल चॅम्पस कु. रेवणसिद्ध फुलारी याचा न्यासाकडून सत्कार
अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे सुपुत्र कु. रेवणसिद्ध फुलारी याची Zee कन्नड सारेगमप लिट्ल चॅम्पस सीजन-१९ साठी निवड झाल्याबद्दल मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कु. रेवणसिद्ध हा दोन्ही डोळ्याने अंध आहे. सत्कार प्रसंगी कु. रेवणसिद्ध फुलारी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, अभियंता अमित थोरात, बाळू पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, स्वप्नील मोरे, उज्वलकुमार आहेरकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.