ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अभंगरंग कार्यक्रमाने अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात धर्म संकीर्तनाला प्रारंभ ; पुण्यातील राजा परांजपे प्रतिष्ठानने गुंफले पहिले पुष्प

अक्कलकोट, दि.८ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहिले पुष्प पुणे येथील राजा परांजपे प्रतिष्ठान प्रस्तुत धर्मसंकीर्तन महोत्सवात गायक संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे, अर्चना राणे व सहकलाकारांच्या अभंग-गायनाने गुंफले. प्रारंभी मंदिर समितीच्यावतीने चेअरमन महेश इंगळे यांनी अर्चना राणे, गायक संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे व सहकलाकारांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार केला, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले.

या कार्यक्रमात सुरुवातीला अभंगरंगातून राम कृष्ण हरी, राजा सुकुमार, विष्णू जग वैष्णवांचा, धर्म निर्गुणाचे भेटी, अलोक गुणासंगे, आता कोठे द्यावे मन, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, भेटी लागे जीवा, स्वामी समर्थ नामाचा घोष करा, स्वामी नेतील नाव ही पैल तीरा, मनी नाही भाव इत्यादी विविध अभंग गायनावर अतिशय उत्कृष्ट अभंग गायन सादर करून श्रोत्यांच्या मनी ठाव घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग देवाचिया द्वारी आज रंगला अभंग’ या भक्तीमय सादरीकरणाच्या अभंगातून उपस्थित रसिक भाविकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात त्यांना हार्मोनियमवर दीप्ती कुलकर्णी, टाळवर हेमंत क्षीरसागर, तबल्यावर सिद्धीविनायक पैठणकर, वाद्यवृंदावर नंदकुमार भांडवलकर, पखवाजवर मानसी बडवे आदींनी उत्तम साथ संगत करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.

यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वला सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, प्रा.नागनाथ जेऊरे, मनोहर देगांवकर, मयुर स्वामी, अक्षय सरदेशमुख, ओंकार पाठक, भिमराव भोसेकर, स्वामीनाथ लोणारी, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, प्रा.शिवशरण अचलेर आदींसह
मोठया संख्येने स्वामी भक्तांनी उपस्थित
राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!