ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरेंनी दसरा मेळावा शिव्याशाप देण्यासाठी घेतला का ? नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र

दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषदे घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर घेतलेल्या मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. बाळासाहेबांचा शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा हा खरा दसरा मेळावा होता, त्यातून आम्हाला विचारांची प्रेरणा मिळायची, सामाजिक कामाची प्रेरणा मिळायची. ज्यामुळे आंम्ही इथवर पोहचलो आहे. पण उद्धव ठाकरेंचा मेळावा फेल होता. तो फक्त तमाशाकारांचा मेळावा होता अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद मोदी आणि अमित शहांवर टीका करण्याची ठाकरेंची पात्रता नाही. यापुढे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्यावर बोलणे बंद केले नाही तर उद्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राजमुद्रा प्रिंटिंग प्रेसच्या गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. प्रबोधन प्रकाशन प्रा. लिमिटेडचे उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत? असा प्रश्न त्यांनी केला आहे. या याचिकेच्या अनुषंगानं बोलताना नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेच मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या आर्थिक उलाढालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘कोरोना दोन वर्षे होता. महाराष्ट्र व देशातील उद्योगधंदे बंद झाले. कारखाने बंद झाले. नोकऱ्या गेल्या. देशात भयावह परिस्थिती होती. अनेक कंपन्या तोट्यात गेल्या. मराठी प्रिंट मीडियातील अनेक कंपन्या बंद पडल्या. देशात ही परिस्थिती असताना ’सामना’ प्रॉफिटमध्ये होता. दोन वर्षांत ‘सामना’नं ४२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि साडेअकरा कोटी नफा कमावला. याचा अर्थ मुख्यमंत्री म्हणून मिळालेले खोके सामनाच्या माध्यमातून पांढरे केले, असा आरोप राणे यांनी केला.

ठाकरेंचं हिदुत्व हे बेगडी हिंदुत्व असून त्यांना हालचाल करायला जर डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते ते कामे काय करणार अशी टीकाही नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले होते, ते अडीच वर्षात अडीच तास तरी मंत्रालयात आले का? तसेच एक तरी काम मराठी माणसासाठी केली आहे का? असे सवाल करत ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते मेळाव्यादरम्यान सांगायला हवं होतं असे नारायण राणे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!