---Advertisement---

धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावे,शिंदे गटाने केली केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी; शिंदे गटकडून पुरावे सादर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर हक्क कुणाचा यासाठी वर्चस्व वादाची लढाई सुरू आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. उद्या शनिवार ८ ऑक्टोबर दुपारी दोन पर्यन्त पुरावे सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर. शिंदे गटकडून गाडी भरून पुरावे निवडूक आयोगाकडे सादर करणायात आले आहेत. यातच आता चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला आणखी एक जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या घटनेला निवडणूक आयोगापुढे आव्हान देत शिवसेना चिन्ह्याबाबत लवकर निर्णय घेऊन हे चिन्ह आम्हाला प्रदान करावे किंवा तात्काळ गोठवावं अशा मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आम्हाला तातडीने मिळावे किंवा याबाबत तातडीने काही आदेश द्यावा अशा शब्दांत प्रसंगी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची अप्रत्यक्ष मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केली आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होण्याची तक्रार पत्रात केली आहे. धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावे, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. येत्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीच चिन्ह मिळावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. आता शिंदे गटाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!