फ्रेंडशिप डे तर दरवर्षी ४ ऑगस्टला येतच असतो मग यात नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण फ्रेंडशिप डे हा केवळ एका दिवसापुरता विषय नाही तर तो माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या शेवटच्या प्रवासापर्यंत एक टप्पा आहे आणि मधल्या काळामध्ये जो आपल्या जीवनामध्ये प्रवास येतो त्या प्रवासामध्ये या फ्रेंडशिपच्या माध्यमातून आपण आपले जीवन सुखकर बनवू शकतो त्याची असंख्य उदाहरणे जगासमोर आहेत.
अनेक जण म्हणतात आयुष्यामध्ये मैत्री जपली पाहिजे, मित्र मिळवले पाहिजेत,प्रत्येकाशी मैत्री केली पाहिजे, लहानांपासून थोरांपर्यंत मनमोकळेपणाने बोलले पाहिजे पण काहीजण याला अपवाद देखील आहेत आणि या अपवादात्मक परिस्थितीत काहींना काही कारणाने गैरसमज होतात त्यात माणसाचा स्वभाव देखील कारणीभूत असतो आणि यातून आपल्यामध्ये दुरावा देखील निर्माण होतो पण निरागस,निरपेक्ष अशी मैत्री जर आपण एकमेकांमध्ये जपली तर मैत्रीचा खरा अर्थ कळायला उशीर लागणार नाही. मैत्री असल्यामुळे व्यवहारिक जीवनामध्ये देखील बऱ्याच वेळा आपल्याला फायदा झाल्याचे दिसून येते. म्हणून मैत्री हे जपली तर पाहिजेच पण ती टिकवण्याच्या दृष्टीनेही सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. भाषा हे जरी संवादाचे माध्यम असले तरी मैत्री करत असताना याची खूप गरज पडते.आता यात मुला – मुलींमध्ये प्रेम, आई-वडिलांमधील प्रेम,आई आणि मुलांमधील प्रेम, वडील आणि मुलांमधील प्रेम, आजोबा आणि नातवांमधील प्रेम,शेजारच्या काका – काकूंवरील प्रेम,समाजावरचे प्रेम, जातीवरचे प्रेम,पाळीव प्राण्यावरचे प्रेम असे असंख्य प्रेमाच्या बाबतीत उदाहरण देता येईल पण हे प्रेम शेवटपर्यंत टिकवणारे किती लोक आहेत हा देखील विषय तितकाच महत्त्वाचा विषय आहे.जेंव्हा आपण एखादयाशी मैत्री करतो तेंव्हा ती कसलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता मैत्री निभावली तरच ती शेवटपर्यंत टिकू शकते अन्यथा ती मध्येच तुटू शकते.बऱ्याच वेळा विचारांमधील साम्य असल्यामुळे देखील मैत्री अतूट बनते त्याची उदाहरणं असंख्य देता येतील. आज आपण राजकारणात देखील पाहिले तर समविचारी माणसे एकत्र येऊन राजकारण करत आहेत. काही विरोधी टोकाची माणसं मैत्री खातर एकत्र आलेली आहेत.हा देखील एक मैत्रीचाच भाग आहे आता ही मैत्री किती काळ टिकते हा वेगळा विषय असू शकतो परंतु फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने आपण या मैत्रीच्या नात्यांमध्ये कोणाही एका घटकाला बसू शकत नाही. पती-पत्नी मधलं प्रेम तर शंभर वर्षाचं नातं असतं आणि हे नातं गेल्या अनेक दशकांपासून टिकून आहे यात अनेक वेळा पती-पत्नीमध्ये काही विषयांमध्ये मतभेद असतात यावरून मुलाकडच्या आणि मुलीकडच्या कुटुंबामध्ये दुरावा सुद्धा निर्माण झालेला पाहायला मिळतो. पण यातही जर दोघांनीही समजूतदारपणा दाखविला तर हा संसाराचा गाडा सुरळीत देखील होऊ शकतो. आज घडीला आयुष्य जगत असताना तडजोड ही फार महत्त्वाची आहे.ऍडजेस्टमेंट केल्याने कितीतरी कुटुंबातील कलह दूर झाल्याचेही चित्र आपण डोळ्यासमोर पाहतो.मैत्रीचं हे नातं नेमकं आहे तरी काय याचा अर्थ आत्तापर्यंत कोणालाही नेमकेपणाने लागू शकला नाही.
पण आपण एकमेकांशी जे जिव्हाळ्याने वागतो, बोलतो ,चालतो यावरूनच ‘मैत्री’ नावाचं हे वलय तयार झाले आहे.बरं हे टिकवण्याची जबाबदारी एका बाजूची नाही
तर ती दुसऱ्या बाजूची देखील आहे.दोघांनी जर ठरवलं तरच मैत्री अबाधित राहू शकते आणि त्याची एक सुंदर मैत्री इतरांसाठी प्रेरणादायी देखील ठरू शकते.हा मैत्रीचा बंध पुराण काळापासून चालत आला आहे.यामध्ये श्री कृष्ण व सुदामा हे घनिष्ट मैत्रीचे उत्तम उदाहरण आहे.अनेक वेळा मैत्रीचा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी राजकीय दृष्ट्या
एक उदाहरण सातत्याने पुढे येते ते म्हणजे भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे नेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे. हे एकमेकांच्या विरुद्ध राजकारणामध्ये काम केले.पण मुंडे आणि देशमुख यांनी राजकारण बाजूला ठेवून जपलेली मैत्री निभावली हे उभ्या महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिले.आज-काल मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये देखील झाल्याचे पाहायला मिळते पण यातून अनेक दुर्दैवी घटना देखील आलेल्या आहेत. यात दोघांमधला समन्वयाचा अभाव आणि दूरदृष्टी कोणाचा अभाव कारणीभूत होऊ शकतो.अशा दुर्दैवी घटना होऊच नये यासाठी प्रत्येकांनी सकारात्मक दृष्टीने विचार करावा. आज आपण लव्ह मॅरेज असं म्हणतो.लव्ह मॅरेज म्हणजे नेमकं काय ती त्या दोघांमधील एक प्रकारची मैत्रीच असते ना आणि त्या मैत्रीचं रूपांतर हे साथीदारांमध्ये होते आणि या प्रक्रियेला आपण प्रेम विवाह सुद्धा म्हणतो. ही गोष्ट फक्त विवाहाच्या बाबतीत लागू होते. एखाद्याला एखादी कविता आवडू शकते, एखाद्याला एखादे पुस्तक आवडू शकते, एखाद्याला एखाद्याचं घर आवडू शकते यातूनच माणसांची जुळवाजुळ होते.
विचारांची जुळवाजुळ होते त्यातून खऱ्या अर्थाने मैत्रीचे नाते जडते आणि निर्माण होते.संपूर्ण जगात जर आपण बघितले तर एकमेकांची झालेली जी कनेक्टिव्हिटी आहे ती एक प्रकारची मैत्रीच आहे पण ही मैत्री निभावण्याचं काम गेले अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे पण या मैत्रीला कुठेही बाधा येऊ नये याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे,
हीच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अपेक्षा.
एकमेकांना भेटा आणि बोला !
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आपल्याला ही शुभेच्छा येतील पण या शुभेच्छा ज्या प्रत्यक्ष भेटताना मिळतात त्या खरंच या माध्यमातून मिळतात का ? का आपण इतके स्वतःला मर्यादित झालो आहोत याचाही कधीतरी विचार व्हायला हवा.अलीकडच्या काळात बीझी शेड्युलमुळे मैत्रीही आता सोशल मीडियाच्या पोस्टपुरती राहणार की काय अशी शंका कधी कधी निर्माण होते. त्यामुळे एकमेकांचा एकमेकांवरील विश्वास वाढावा,मैत्रीत ओलावा निर्माण व्हावा आणि हा खऱ्या अर्थाने मैत्री समृद्ध करायची असेल तर किमान फ्रेंडशिप डेच्या दिवशी तरी एकमेकांना भेटा आणि बोला.
–मारुती बावडे,अक्कलकोट
९९६०१३११७४