ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिलीप सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये ३१० जणांचे रक्तदान;मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अक्कलकोट,दि.६ : शिवराज्याभिषेक दिन
व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त ३१० जणांनी रक्तदान केले.अक्कलकोटच्या प्रियदर्शनी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.शिबिराचे हे ३७ वे वर्ष आहे.या माध्यमातून आत्तापर्यंत २० हजार बाटल्या
रक्त संकलित झाल्या असून या माध्यमातून अनेकांना जीवदान मिळाले आहे.सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा आहे त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला.या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,सुत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे,जेष्ठ नेते प्रकाश वाले,ऍड.धनंजय माने,माजी जि.प.सदस्य मल्लिकार्जुन पाटील,वटवृक्ष देवस्थाचे अध्यक्ष महेश इंगळे,अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,सोलापूरचे बाळासाहेब वाघमारे,माजी नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी,काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला,बाळासाहेब मोरे,डॉ.सुवर्णा मलगोंडा,जय हिंदचे
बब्रुवान माने देशमुख,उमेश पाटील,बसवराज बाणेगाव,प्रकाश वानकर,एजाज मुतवल्ली,अविनाश मडीखांबे, तुकाराम
कोळेकर,मानाजी माने,राम जाधव,सिध्दप्पा कल्याणशेट्टी,सुरेशचंद्र सूर्यवंशी,आनंद तानवडे,विलास गव्हाणे,महादेव वाले,शिवराज स्वामी,सुनील खवळे,माणिक बिराजदार,शंकर व्हनमाने,मैनुद्दीन कोरबू,धनाजी
मोरे, बाजीराव खरात,शरणप्पा कबाडे आदी उपस्थित होते.दरम्यान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,माजी मंत्री
बसवराज पाटील,आमदार अरुण लाड,शैलेश पाटील चाकूरकर ( लातूर ),धीरज पाटील ( उस्मानाबाद ),माजी आमदार रवी पाटील यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिले.
आज दिवसभर अक्कलकोट शहर आणि ग्रामीण भागातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराला हजेरी लावून सिद्धे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या शिबिरासाठी सोलापूर ब्लड बँक,सिद्धेश्वर ब्लड बँक आणि हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य लाभले.गेल्या ३७ वर्षांपासून
हा उपक्रम राबविला जातो.दोन वर्षापूर्वी कोरोनाचे संकट होते त्या काळात शक्य तेवढे योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.रक्तदानापेक्षा श्रेष्ठ दान या जगात कुठलेही नाही म्हणून कार्यकर्ते दरवर्षी हा उपक्रम राबवित असतात,असे तालुकाध्यक्ष सिद्धे यांनी सांगितले.शिबिरानंतर संध्याकाळी
ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम शिबिर यशस्वी करण्यासाठी अविराज सिद्धे,विशाल राठोड,स्वामी
चौगुले,नवनीत राठोड, श्रीशैल चितली,राहूल राठोड,यतिराज सिध्दे,ओमकार सिद्धे,प्रकाश टाके,रशीद खिस्तके,योगेश नाईकनवरे आदींनी सहकार्य केले.या रक्तदान शिबीरात रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्याचे आभार सुनिल सिध्दे यांनी मानले.

बादोले व सोलापूर
येथेही उस्फूर्त प्रतिसाद

तालुक्यातील बादोले गावातही सिध्दे यांच्या वाढदिवसानिमत्त शांतकुमार सलगरे यांनी आयोजित केलेल्या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले.सोलापूर येथे त्यांच्या निवास स्थानी ३० जणांनी रक्तदान केले.या ठिकाणी उत्स्फूर्तपणे रक्तदान पार पडले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!