पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परिक्षार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. परीक्षा रद्द केली जाऊ नये म्हणुन पुण्यातील शास्त्री रस्त्यावर परिक्षार्थी हजारोंच्या संख्येत एकत्रीत येऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोविड – १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.
परीक्षा एक-दोन नव्हे तर आतापर्यंत पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्यामुळे उमेदवार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते.